ज्यूनिअर वकिलांना दरमहा १० हजार रूपये मानधन द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील ज्युनिअर वकीलांना दरमहा दहा हजार रूपये मानधन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना गुरूवारी १३ जानेवारी रोजी निवेदन दिले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जूनियर वकील हे सर्वसाधारण कुटुंबातील घटक असून वकीली शिवाय दुसरा कुठला उद्योग नाही. तसेच उत्पन्नाचे कोणतेही दुसरे साधन नाही. त्यामुळे बऱ्याचदा जुनियर वकिलांना अनेक दैनंदिन आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांनी ज्याप्रमाणे ज्युनियर वकिलांना दरमहा मानधन देण्यात येते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील ज्युनियर वकिलांना दरमहा १० हजार रुपये म्हणून सुरुवातीच्या पाच वर्षं करता देण्यात यावे, जेणेकरून ज्युनिअर वकिलांच्या सन्मानाचे जीवन जगता येईल असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर हर्षल संत, विशाल रोझतकर, सुनील सोनवणे, केतन रंधे, समाधान सपकाळे, अर्जुन खैरनार, राकेश शौर्य, निलेश जाधव, चंद्रकांत सोनवणे, आशुतोष चंदेल, पंकज पाटील, कुलदीपसिंह चंदेल, अभिजीत रंधे, वाय. आर. वाणी, ॲड. सिद्धार्थ मेढे, आनंद शुक्ला, हेमंत गिरणारे यांच्यासह आदी वकिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!