कडगाव विकासोवर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

कडगाव विकास सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून सर्व १३ उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. समोरील विद्यमान सरपंच, उपसरपंचाच्या परिवर्तन सहकार पॅनलचा दारूण पराभव झाला.

नवनियुक्त संचालक मंडळ साधारण मतदार संघ -पाटील वसंत दयाराम ,पाटील किरण मोतीराम ,पाटील अशोक निलकंठ,पाटील सुहास सुक्राम ,पाटील कैलास अर्जुन ,धनगर किरण पितांबर ,पाटील कल्पेश एकनाथ पाटील धीरज सुधीर महिला राखीव-कोल्हे सुनंदा रामदास, पाटील मीनाक्षी हेमराज इतर मागासवर्गीय- पाटील रोहिदास विष्णू अनुसुचित जाती- जमाती कोळी सुहास कडू विमुक्त जाती /भटक्या विमुक्त जाती / कोळी (सपकाळे) भास्कर अंकात सदर निवडणुकीसाठी भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस योगेश धनराज पाटील, विवेक सुधीर कोल्हे, डॉ. हेमराज शांताराम पाटील, डिगंबर अर्जुन पाटील ,डिगंबर पाटील, चंदन कोल्हे, नरेंद्र सपकाळे, राजेश पाटील माजी सरपंच, ज्ञानदेव पाटील, नवल सपकाळे हिरामण कोळी यांनी पॅनल निवडुन येण्यास अथक परिश्रम घेतले.

Protected Content