रेल्वे प्रवाशांना मिळणार अवघ्या ४९ पैशांत १० लाखांचा विमा

timthumb

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून अवघ्या ४९ पैशांत प्रवाशांना १० लाखांचा विमा दिला जात आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून रेल्वेचे तिकीट खरेदी केल्यास प्रवाशांना या विम्याचा लाभ मिळू शकतो.

 

आयआरसीटीसीची ही सेवा आधी प्रवाशांना मोफत दिली जात होती. परंतु, आता या सेवेसाठी ४९ पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. जर प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून रेल्वे तिकिट बुक केले तर तिकिटाव्यतिरिक्त ग्राहकांना ४९ पैसे जास्तीचे मोजावे लागेल. जर रेल्वे प्रवाशांना विमा हवा असल्यास ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना हा पर्याय दिसेल. यासाठी ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल. तसेच अधिकृत माहिती भरल्यानंतर यासंबंधी माहिती एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना मिळेल.

प्रवाशांचे तिकीट आरसी किंवा कन्फर्म असेल तरच या विम्याचा लाभ प्रवाशांना मिळेल. रेल्वे दुर्घटनेत प्रवाशाचा मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या प्रवाशाला १० लाखांचा विमा मिळेल. अर्ध अपंगत्व आल्यास सात लाख ५० हजार रुपये मिळतील. हॉस्पिटलमधील उपचारासाठी अतिरिक्त दोन लाख रुपयांचा विमा मिळेल.

Add Comment

Protected Content