भारतबंदला यावलमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

यावल प्रतिनिधी । देशाच्या अन्न पुरवठा करणाऱ्‍यांविरोधात काळा कायदा लादल्याबद्दल दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला यावलमधून उस्फूर्त प्रतिसाद  मिळाला आहे.

दरम्यान, आज दि.८डिसेंबर रोजी केन्द्रातील शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात पारित केलेले शेतकरी विरोधातील काळे कायदे तात्काळ मागे घ्यावे, याकरिता संपुर्ण देशातील लाखो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असुन आपल्या देशाच्या अन्नदाताला बळ देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, कॉग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी शासनाने या आंदोलनात सहभाग नोंदवुन पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला यावल शहर व तालुक्यात सर्व व्यापारी यांनी आपली दुकाने कडकडीत बंद पाडले आहे. 

राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आज यावल येथील भुसावल टी पॉइटवर आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवण, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी सोनवणे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे विजय प्रेमचंद पाटील, नाना बोदडे, हेमंत येवले, युवक राष्ट्रवादीचे अॅड. देवकांत पाटील, प्रशांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितिन चौधरी, हितेश गजरे, गनी भाई, कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद, खान, शहराध्यक्ष कदीर खान, खरेदी विक्री संघाचे अमोल भिरूड, ग्रामीण कॉग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल, कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, अनुसुचित जाती आघाडीच्या चंद्रकला इंगळे, अनिल जंजाळे, शिवसेने माजी तालुका प्रमुख कडु पाटील, संतोष खर्च, सागर देवांग, मोहसीन खान आदीनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी भुसावळ टी पॉईटवर करण्यात आलेल्या रस्ता रोकोत चोपडा ते फैजपुर, यावल ते भुसावळ मार्गावरील वाहतुकीचा सुमारे एक तास खोळंबा झाला.

 

Protected Content