अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाळ योजना लागु करा

WhatsApp Image 2019 09 17 at 7.27.45 PM

यावल, प्रतिनिधी | येथे भीम आर्मीद्वारे निवेदनाद्वारे आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांना अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना एटीकेटी विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाळ योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

अनुसूचितजमातीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठीत्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्याबाबत पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंयोजना शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आलेली आहे.ज्या आदिवासी विद्यार्थ्यांचा एफ.वाय.बी.ए.ला एटीकेटी निकाल लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल योजने अंतर्गत फॉर्म भरला आहे. त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. शासन निर्णयानुसार जर ज्या विद्यार्थ्यांचे शासकीय वस्तीगृहात प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असतो त्यांचा निकाल एटीकेटी असला तरी सुध्दा त्यांना शासकीय वस्तीगृहाच्या सर्व सुविधा दिल्या जातात. तर शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत लाभ दिला जात नाही. वास्तविक सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने तसेच निवासी व शैक्षणिक सुविधांपासून आदिवासी विद्यार्थी वंचीत राहु नये म्हणुन पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत लाभ दिला जाऊन निवासी व शैक्षणिक सुविधांपासून आदिवासी विद्यार्थी वंचीत राहु नये ही मागणी  करण्यात आली आहे. निवेदनावर नशिर उखर्ड तडवी, स्वप्नील सोनवणे, तसलीम छबु तडवी, दिलीप वसावे, देवीलाल अमरसिंग पावरा, उदेसिंग वळवी, महेंद्र पावरा, राजेंद्र तडवी, चेतन गजरे, मुस्तफा मुजा तडवी, आकाश तायडे, बंटी सोनवणे, विजय मेघे, कुंदन तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content