राजोरा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रास जिल्हा परिषद सीईओंची भेट

यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील राजोरा ग्रामपंचायत व परिसरातील नागरीकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रास जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी भेट दिली.

यावल तालुक्यातील राजोरा ग्रामपंचायत व परिसरातील नागरीकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा हा अंतीम टप्यात असून मंगळवार, दि. ४ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी लसीकरणाचं कार्य सुरु असतांना राजोरा उपकेंद्रास भेट दिली.

याप्रसंगी जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांनी राजोरा प्राथमिक उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.जाकीर हुसेन पिंजारी यांचे व त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी व सहकाऱ्यांनी कोरोना संसर्गाच्या संकटमय काळात ग्रामीण पातळीवर नागरीकांच्या सुरक्षेतेसाठी केलेले प्रतिबंधक लसीकरणाच्या कार्याचे आणि राजोरा गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

या प्रसंगी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, भालोद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.प्राजक्ता चव्हाण, भालोद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.जाकीर हुसेन शेख पिंजारी, आशा वर्कर आशा पाटील, मनीषा महाजन, मंगला सोनवणे, ज्योती ठाकरे , मदतनीस हेमलता नारखेडे यासह राजोरा ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा पाटील, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील, दिनेश पाटील, अरुण पाटील, मधुकर नारखेडे, युवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Protected Content