सावधान : कोरोना जिल्ह्यात पन्नासच्या वर अॅक्टिव्ह रुग्ण – जिल्ह्यात आज १३ नवे पेशंट

जळगाव प्रतिनिधी | राज्याप्रमाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून अधिक सावधानता बाळगत कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयाने पाठवलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकूण १३ कोरोना रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे

जळगाव जिल्हा आज पाठवलेल्या कोरोना अहवालात नमूद केल्याप्रमाणे दिवसभरात एकूण १३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या १३ रुग्णांपैकी शहरातील ५, चोपडा येथील ४ तर भुसावळ येथील ३ रुग्ण आहेत. तर १ रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील आहे.

जिल्ह्यात आज ५२ अॅक्टीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४२ हजार ८६७ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content