चोपड्यात उद्या पुरग्रस्तांसाठी मदतफेरीचे आयोजन

chopada 1

चोपडा प्रतिनिधी । जैन अल्पसंख्याक महासंघ चोपडा सिटी फाऊडेशन व तालुका मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी “पुरग्रस्त मदत फेरी”चे आयोजन दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता गोल मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे आजाद चौकपर्यंत करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, या पुरग्रस्त मदत फेरीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, सरळ हाताने जास्तीत जास्त रोख स्वरूपात मदत करावी असे आवाहन जैन महासंघ शाखा अध्यक्ष तेजस जैन, सचिव प्रणय टाटिया, उपाध्यक्ष मयूर चोपडा; चोपडा सिटी फाऊडेशनचे मार्गदर्शक डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष अजय पालीवाल, सेक्रेटरी जितेंद्र विसपुते, संजय श्रावगी, तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दिपक पाटील, सेक्रेटरी प्रविण मिस्त्री या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

फेरीच्या माध्यमातून एकत्रित निधी तत्काळ उपयोगी पडावा यासाठी फेरी पूर्ण होताच अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मदतकार्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सुशिल टाटिया, नेमिचंद जैन, नितीन जैन, विनोद बी.टाटिया, संदेश जैन, राजेंद्र आर.जैन, सुनिल बरडिया, अशोक जैन, मनोज अग्रवालसर, स्वप्निल महाजन, अविनाश कुळकर्णी आदींनी बोलतांना सांगितले आहे.

Protected Content