भोनक नदीला पुर ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

bhokan nadi

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल गावाजवळून वाहणारी भोनक नदीला पुर आल्यामुळे गेल्या 3 दिवसांपासुन पुराचे पाणी ओसांडून वाहत आहे. यामुळे परिसरातील भुवनेश्वरी विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना पुल नसल्यामुळे या नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागत असल्यामुळे पालकवर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  मनवेल येथील भोनक नदी पावसाळ्यात वाहत असते. या नदीवर पुल बांधण्याची मागणी अनेक दिवसांपासुन पालक वर्गाकडून होत आहे. नदीच्या बाजुलाच शाळा असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे मनवेल, थोरगव्हाण, पिळोदा, खुर्द्, शिरागड येथील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचेही शेती कामे खोळबंल्याने शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांनी लावलेली केळीचे झाड कापले जात नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. या सर्व प्रकारामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांना आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. १९९२ पासुन श्री भुवनेश्वरी विद्या प्रसारक मंडळाची शाळा सुरु असुन लोक प्रतिनिधींकडे याविषय घेवुन वांरवार मागणी करण्यात आली. मात्र पुलाचा प्रश्न सुटत नसल्यामुळे शेतकरी आणि पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे.

Protected Content