आयएमआर महाविद्यालयात आयटी फेस्टाचे थाटात उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईच्या आयएमआर महाविद्यालयात “टेक्निकल इव्हेंट आयटी फेस्टा-२०२३” चे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल नाईक, जळगाव जनता सहकारी  बैंक आमचे प्रमुख तसेच मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर डॉ. हर्षवर्धन जावळे (एमएस) ऑर्थोपेडीक आणि इन्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या.

 

याप्रसंगी अतूल नाईक यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन करताना,  आय. टी. ने काबीज केलेले असून विद्यार्थ्यांनी त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची , शिकण्याची तयारी ठेवावी. महाविद्यालयीन शिक्षणात आपला पाया मजबूत करावा. प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून घ्याव्या. त्याच प्रमाणे झपाट्याने बदलणाऱ्या जगाला सामोरे जाण्यासाठी नेहमी सजगता असावी.

 

आयटी फेस्टा 2023 चे यंदाचे सलग चोविसावे वर्ष असून, या कार्यक्रमात आज क्रमश: ‘सॉफ्टवेअर वर्ष एक्झिबीशन: बेब डेव्हलपमेंट! आणि आयटी क्विस अशा तीन कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आल्या. सॉफ्टवेअर एक्सिबिशन मध्ये एकूण ३० स्पर्धकांनी वेगवेगळ्या टीम मधून  वेगवेगळ्या क्षेत्रात कामी पड‌णारे सॉफ्टवेअर डेव्हलप करून प्रेझेंट केले.  वेब डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग मध्ये तीन तासात दिलेल्या विषयावर सहभागी एकूण ४० विद्यार्थ्यांना वेबसाईट डेव्हलप करायचे आव्हान देण्यात आले.

 

 

या कार्यक्रमासाठी मोहित जाधव, निकेश चौधरी, निलेश बडगुजर ह्या विद्यार्थ्यांनी  सतिश दमाडे यांच्या  मार्गदर्शनाखाली काम पाहिले. ह्या स्पर्धेच्या परिक्षक म्हणून मिस नेहा केंकरे, सिनीअर  क्यू.ए. इंजिनीअर,  मीडियाओशन कंपनी यांनी काम पाहिले. आयटी क्विझ  साठी सुद्धा एकूण ११० टिम्स ने सहभाग नोंदविला. ह्या दोन्ही स्पर्धेमध्ये  एकूण २९० विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला गेला.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कन्व्हेनर प्रा. अंकिता तिवारी आणि प्रा. भावना जावळे यांनी परिश्रम घेतलेत. तसेच सॉफ्टवेअर एक्झीविशन स्पर्धेसाठी आय. एम. आर. च्या  इंन्होवेशन काऊन्सिल च्या प्रमुख डॉ वर्षा पाठक यांनी परिश्रम घेतले. तसेच आयटी क्विज़ साठी प्रा. दिपाली किरंगें,  प्रा. श्वेता रमाणी यांनी काम पाहिले संस्थेच्या अकॅडमीक डीन तसेच एचओडी डॉ. तनुजा फेगडे यांचे मार्गदर्शन लाभले.  प्रा. एस एन खान, प्रा. उदय चतुर, प्रा. रुपाली नारखेडे, प्रा. प्रकाश बारी, प्रा. श्वेता फेगडे, प्रा. उत्कर्षा राणे यांचे सहकार्य लाभले.

 

उद्या म्हणजे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दि. १८ रोजी पोस्टर प्रेझेंटेशन, C,  C++ कॉम्पीटीशन तसेच गेमींग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. असे आयोजकांनी कळवले असून उ. म. वी. परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले.

Protected Content