Home क्राईम श्रीकांत ढिवरे जळगावचे नवे पोलिस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

श्रीकांत ढिवरे जळगावचे नवे पोलिस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, विद्यमान पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावचे नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीकांत ढिवरे हे 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांची मुंबईहून धुळे येथे बदली झाली होती.

विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत त्यांची ठाम पकड असल्याचे मानले जाते.


Protected Content

Play sound