Home Cities यावल खान्देश विभागाच्या कर्मचारी कोळी महासंघ अध्यक्षपदी जितेंद्र सपकाळे

खान्देश विभागाच्या कर्मचारी कोळी महासंघ अध्यक्षपदी जितेंद्र सपकाळे


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश विभाग कर्मचारी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. रमेश पाटील यांनी खान्देश विभागाच्या अध्यक्षपदी दुसखेडा तालुका यावल येथील राहणारे जितेद्र सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिह्यात कोळी महासंघाचे काम करतांना कोळी समाजाचे कर्मचारी यांना जातीच्या दाखला संदर्भात अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणी सुलभपणे सोडविणे तसेच अनेक कर्मचारी अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गतुन नोकरीला लागलेत परंतु आज पावेतो न्यायालय आदेशा शिवाय एकालाही वैधता प्रमाणपत्र समितिने दिले नाही. हा एक प्रकारे म्हणजे मुद्दामपणे दिला जाणारा समाज बांधवांना त्रास देण्यासारखेच आहे. या सर्व गोंधळात कर्मचार्यांना हेतुपुरस्कर मानसिक त्रास दिला जात आहे. ह्या त्रासाला कंटाळून अनेक कर्मचारी यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत नोकरी गेल्यामुळे अनेक जनांचे संसार उध्वस्त झाले आहेत सरकार ह्या कड़े हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे. शासनाने या बाबतीत न्यायाची भूमिका घेणे अपेक्षित असतांना यात राजकारण केले जात आहे आणि वर्षनवर्षापासुन सुरु आहे हा लढ़ा कोळी कर्मचारी बांधव अविरत करत आहेत परंतु न्याय आजपर्यत्न दिसला नाही मागील काळात ज्या समाज बाँधवानी यासाठी संघर्ष केला त्या सर्व समाज बांधवाचे मार्गदर्शन घेऊन हा लढा मला दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून पुढे न्यायचा आहे ह्या नियुक्ति बद्दल माझे आ. रमेश पाटील, आ. लता सोनवणे, प्रभाकर सोनवणे, कैलास सोनवणे,  अश्विनभाऊ सोनवणे, मुकेश सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे ,सुभाष सोनवणे, संदिप कोळी यांनी अभिनंदन केले .


Protected Content

Play sound