कोळवद व वड्री येथे स्वॅब तपासणी मोहिम

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद व वड्री येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर स्वॅब तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे.

कोविडचा वेगाने वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे , डॉ. गौरव भोईटे, व डॉ. नसीमा तडवी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम व परिसरातील गावामंध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कोळवद व वड्री ग्राम पंचायत येथे स्वॅब तपासणी मोहिम राबविण्यात आली आहे.

आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी व भूषण पाटील यांनी गावपातळीवर ग्राम पंचायत सदस्यांची तसेच समाजसेवी कार्यकर्त्यांची ग्रामसभा घेऊन कोविंड-१९ बाबतच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आपली आरटीपीसीआर स्वॅब (टेस्ट) करून घेतली.

गावचे प्रथम नागरिक सरपंच याकुब विनायक तडवी, उपसरपंच शशिकांत चौधरी, सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, मंगला महाजन, मुमताज तडवी, लिलाबाई सूर्यवंशी, आरती अढायागे, जनाबाई बाऊस्कर, मिनाक्षी भिरूड, व मनिषा महाजन आदि ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचार्‍यांसह २० व्यक्तींनी कोविड-१९ तपासणीसाठी स्वॅब दिले.

संंबंधीत स्वॅब तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आले. कोरोना संदर्भातील जनजागृती व शिबीर यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे , भुषण पाटील, महेमुदा तडवी, प्रतिभा चौधरी व आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.

Protected Content