आमदारांची शादीखान्याला मंजुरी; नगरपालिका प्रशासनाचा खोडा !

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी शादीखाना हॉलसाठी परवानगी मिळाली असली तरी नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांनी मात्र याला परवानगी नाकारल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत विरोधी पक्षातर्फे गटनेते फिरोज पठाण यांनी आवाज उठविला आहे.

याबाबत वृत्त असे की, सावदा येथे नगरपालिका हद्दीत वाढ झालेल्या पना पिर नगर,रज़ा नगर,तसेच ख्वाजा नगर,ताजुशरीया नगर या परिसरातील तसेच गावातील लोकसंख्येनुसार या भागात सर्व नागरीकांना लग्न कार्य करीता होत असलेला त्रास पाहता मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण व नगरसेवकांनी सदर परिसरात शादी खाना कम्युनिटी हॉल बांधून मिळावा अशी मागणी केली होती.

यासंदर्भात शासन दरबारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले प्रयत्न मुळे शादीखाना कम्युनिटी हॉल बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात अनुदान व मिळालेली मंजुरी संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा याला दिलेल्या आदेशा प्रमाणे, सदर परिसरात शादीखाना हॉल बांधकाम करणे विषयी जागा ची सध्याचीस्थिती बाबतचे, कागदपत्री, माहिती व हमी सार्वजनीक बांधकाम विभागाने दि ४/२/२०२१ च्या पात्र द्वारे नगरपालिकेकडे मागीतलेली आहे.

या अनुषंगाने सदर ठिकाणी शादीखाना हॉल उभारणे करिता ना हरकत दाखला व देखरेख संदर्भात होणारी सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते यांनी नगराध्यक्षा अनिता येवले व मुख्य अधिकारी सौरभ जोशी यांच्याकडे करूनही काही एक उपयोग झाला नाही.

संबंधीत हॉलचा संपूर्ण खर्च शासन करणार असून पालिकेस कोणताही खर्च नवीन हॉल करिता करावा लागणार नाही फक्त देखरेख संदर्भात ठराव करून पुढील होणार्‍या सभेमध्ये ना हरकत प्रमाणपत्र देऊन मान्यता मिळणे कामी नाईलाजाने शादीखाना हाल बांधकाम बद्दल कलम ८१ प्रमाणे विशेष सभेमध्ये हा विषय घेऊन ठराव करण्यात यावा अशी मागणी फिरोजखान पठाण यांनी केली आहे. या निवेदनावर नगरसेवक राजेश वानखेडे, विरोधी गटनेते फिरोजखान पठाण, अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, सिद्धार्थ बडगे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, विजया कुशल जावळे, नाजरा बी ईस्त्याक, अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष व विशेषकर सत्ताधारी गटाच्या नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांच्या सह्या आहे

हा सर्व प्रकार नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांचा मनमानी कारभार दर्शवित असल्याची प्रतिक्रिया विरोधी गटनेते फिरोज खान पठाण व नगरसेवक राजेश वानखेड़े यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content