आभोडा धरणाजवळ तडसाचा संशयास्पद मृत्यु

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे आभोडा धरणाजवळ वन्य प्राणी तडसाचा संशयास्पद मृत्यु झाल्याने वन्यप्राण्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतू, अनेक दिवसांपासून तडसाचा मृत्यु झाला असावा, असा प्राथमिक अदांज व्यक्त करण्यात येत आहे.

वन विभागाच्या सूत्रान कडून मिळालेल्या माहीती नुसार रावेर तालुक्यातील आभोडा धरणा नजिक कंपामेंन्ट नंबर १७ च्या टिसीएम जवळ कुजलेल्या अवस्थेत तडस मृत अवस्थेत कुजलेल्या स्थितीत सापडला यावेळी या मृत तडसावर वनपाल अतुल तायडे यांनी अंत्यसंस्कार केले दरम्यान याबाबत वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांना संपर्क करण्याचा प्रर्यत्न केला असता. त्यांचा मोबाईल बंद येत होता.

 

Protected Content