बोदवड तालुक्यात पिक नुकसानीची आ. चंद्रकांत पाटलांकडून पाहणी

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील करंजी, भानखेडा, गोळेगाव परिसरात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी आ. पाटील यांनी मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी पाणंद रस्ते त्वरीत मंजूर करण्याच्या सुचना देण्यात आल्यात.

भांनखेड्यात पावसामुळे पडलेल्या घराची पाहणी केली  व तहसीलदार साहेब यांना संबंधित घरामलकास त्वरित मदत माणसाच्या सूचना दिल्यात. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख गजानन गोडके, नगराध्यक्ष सईद बागवान, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, दीपक माळी, तसीलदार प्रथमेश घोलप, कृषी मंडळ अधिकारी नूतन लांडगे, सरपंच जांकिराम पाटील, देशमुख काका, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक सलीक कुरेशी, नगरसेवक, देवेंद्र खेवलकर, धनराज गंगतिरे, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक नितीन चव्हाण, नगरसेवक इरफान भाई, नगरसेवक अकबर बेग, डॉ देविदास पाटील, तालुका संघटक शांताराम कोळी, शहर प्रमुख हर्षल बडगुजर, शिक्षक सेना तालुका प्रमुख संदीप तायडे, अ.सं. जि. उपसंघटक कालीम शेख, विभाग प्रमुख गोपाळ पाटील, मुकेश महाजन, सुभाष देवकर, परेश अग्रवाल, गजानन पाटील, सलीम मण्यार, बाबा बागवान, गजानन भोंडेकर, भूषण भोई, आनंद खोडके, सचिन भोई, शिवसैनिक व पदधिकारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

Protected Content