‘ते’ १९ बंगले रश्मी ठाकरे यांचेच ! : सोमय्यांचा पुनरूच्चार

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांनी कितीही इन्कार केला असला तरी रश्मी ठाकरे याच त्या १९ बंगल्यांचा टॅक्स भरत असल्याने ते बंगले त्यांचेच असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राऊत आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले.

संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजयुमोचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप केला. तर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात वापरण्यात आलेल्या कार्पेटची किंमत साडेनऊ कोटी रुपये असल्याचा दावाही राऊत यांनी केला. या आरोपाला आज सोमय्यांनी उत्तर दिले.

आज भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, किरीट सोमय्यांना जोड्याने मारण्याची गोष्ट आहे की रश्मी ठाकरेंना संबोधून संजय राऊत बोलत आहेत. १९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे. हा कर किरीट सोमय्यांनी भरलेला नाही. संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात?, अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरलीय. त्याचं ५.४२ लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. २००८ मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट २०१४ मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हे २०२० ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी १२ महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केलाय.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर १२ नोव्हेंबर २०२० ला मालमत्ता कर भरल्यानंतर घरं चोरीला गेली का? मुख्यमंत्र्यांची घरं चोरीला गेल्याची तक्रार मी पोलीस ठाण्यात दिली आहे. आता जाऊन मग घरं नाहीये दाखवायचं नाटक कशाला? घरं नाहीयेत हे मी वर्षभरापासून सांगत आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि मनिषा वायकर यांनी घरं असल्याचा आभास निर्माण करत कोटींची संपत्ती दाखवल्याचा आरोप मी नाही करु शकतं. अन्वय नाईक खोटारडेपणा करत होते असं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे का?, अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली.

Protected Content