पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे लेवा भवनात मोफत कोरोना लसीकरण(व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि महापालिकेच्या वतीने आज शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात मोफत लसीकरण शिबीराच शुभारंभ आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आला.

 

भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला आघाडी प्रमुख दिप्ती चिरमाडे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ धर्मेंद्र पाटील यांच्यासह आदी उपस्थीत होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. जळगाव भारतीय जनता पाटील आणि जळगाव महापालिकेच्या वतीने शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात नागरीकांच्या सोईसाठी आज शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मोफत लसीकरण शिबीर घेण्यात आले. यासाठी जळगाव शहरातील नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून तयारी केली होती. प्रत्येक कार्यकर्त्यांनी शांततेत नागरीकांची माहिती संगणीकृत करून रांगेत प्रत्येकाला टोकन देण्यात आले. कुठलाही गोंधळ उडाला नाही. अपंग आणि वृध्दांसाठी वेगळी सुविधा उपलब्ध दिल्याने त्यांनाही कुठला त्रास झाला नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे लसीकरण शिबीर राहणार आहे, अशी माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली.

२२७१ नागरिकांनी घेतला लाभ 

दरम्यान, कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळी ७ वाजेपासून रांगा लावल्या होत्या.   लसीकरणाचा २२७१ नागरिकांनी लाभ घेतला. या प्रसंगी उपस्थित जेष्ठ नागरिक  व महिला भगिनीं  या  विषेश लसीकरण  आयोजित केल्याबाबत आनंद व्यक्त केला असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले.

 

 

भाग १

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/554304392566913

भाग २

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1277963326003353

 

Protected Content