दहीगावचे पी. डी. चौधरी आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील प्रगतीशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते पी. डी. चौधरी यांचा मासिक माळी भुषणच्या वतीने सन २०२१मधील आदर्श  शेतकरी पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 

जळगाव जिल्ह्यातील २१ भुमिपुत्रांचा नुकताच अमळनेर येथील माळी मंगल कार्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात सन्मान करण्यात आला. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते पी. डी. चौधरी यांना  आदर्श शेतकरी या पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिरपुरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चौहाण , मसिक माळी भुषणचे संपादक भिमराव महाजन , नाना पोपट महाजन , मनोहर महाजन, माळी पंच कमेटीचे अध्यक्ष ए. के. गंभीर ( सर लासुर ) आदी मान्यवर या पुरस्कार सोहळयास प्रामुख्याने उपास्थित होते.  दरम्यान आदर्श शेतकरी या पुस्काराने पी. डी. चौधरी यांचा सन्मान झाल्याने त्यांचे जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती सुरेश देवराम पाटील , दहीगावचे माजी सरपंच देवीदास धांगो पाटील, यावल पंचायत समितीचे माजी सदस्य नागेश्वर साळवे, कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक राकेश फेगडे, पत्रकार जिवन चौधरी , पत्रकार ए .टी. चौधरी यांच्यासह आदींनी त्यांचे अभीनंदन केले.

 

Protected Content