कोळन्हावी येथून वाळूची चोरी; यावल पोलीसात नोंद

यावल प्रतिनिधी । कोळन्हावी शिवारातून वाळूच्या साठ्यातून अज्ञात चोरट्यांनी वाळू चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी शिवारात २७ ऑगस्ट २०२१ सकाळी ६ ते १५ सप्टेंबर २०२१ सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वाळूच्या साठ्यातून वेळोवेळी वाळूची चोरी केल्याची उघडकीला आले आहे. याप्रकरणी पोलीस पाटील कैलास सोळंके यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख हे करीत आहे.

Protected Content