मोहाडी येथे रामदेवबाबा जयंतीनिमित्त आरोग्य निदान व रक्तदान शिबिर संपन्न

पाचोरा, नंदू शेलकर   । तालुक्यातील मोहाडी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

रामदेवबाबा जयंतीनिमित्त  दि. १६ सप्टेंबर रोजी मोहाडी येथे आरोग्य निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  याप्रसंगी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर, माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, दत्तात्रय तेली, देविदास सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी विकास नाईक, नितीन पाटील, रणछोड राठोड, रविंद्र पाटील, कैलास महाजन, राजू नाईक, योगेश जाधव, किसन जाधव, भगवान जाधव, किसन चव्हाण यांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरामध्ये गावातील महिला, पुरुष रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.  विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. साहिल पिंजारी, डॉ. प्रकाश चव्हाण, डॉ. मनोज कासार, परिचारक अक्षय संजय, शुभांगी जंगले, भारती पवार यांनी तपासणी केली. रक्त संकलनासाठी प्लस बँक जळगावचे डॉ. अमोल शेलार, डॉ. विरेंद्र बिराडे, डॉ. सलमान पटेल, डॉ. नीलेश घोंगडे, डॉ. जाधव, डॉ. रहमान शहा यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू नाईक, किसन चव्हाण, गोकुळ जाधव, सतीश नाईक, बद्रीनाथ नाईक, अक्षय नाईक, ईश्वर नाईक, प्रदीप नाईक, निलेश नाईक, युवराज जाधव यांचेसह मोहाडी येथील सर्व ग्रामस्थ व माणुसकी ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Protected Content