सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिराचे कळसाचे काम पूर्ण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पिंप्राळा परीसरातील सोनी नगर,सावखेडा रोड जवळील स्वयंभू महादेव मंदिराचे जिर्णोद्धारचे काम सुरु असून मंदिरात कळस घडविण्याचे शिल्पकार  सचिन सोनावळे, श्री डांगे व त्यांच्या सहकार्य टीम (नांदेड) साकारत आहे. या टिमने 10 दिवसात काम पूर्ण केल्याने परीसरातील शिवभक्तांनी शिल्पकाराचा गौरव करण्यात आला.

 

यावेळी मधुकर ठाकरे, देविदास पाटील, नरेश बागडे, यशवंत पाटील, विजय चव्हाण, भैय्यासाहेब बोरसे, विनोद निकम, सरदार पाटील, निलेश जोशी, नारायण येवले, स़ंजय भोई, विलास दांडेकर, विजय भावसार, विठ्ठल जाधव, धनंजय सोनार, कैलास कोळी, गणेश माळी, गणेश जाधव, सूर्यकांत पारखे, प्रकाश जाधव, धनराज कुंभार, मुकुंदा निकुंभ आदि भाविक उपस्थित होते.

 

सोनी नगरातील स्वयंभू महादेव हे जागृत देवस्थान असून या मंदिरात मनोकामना पूर्ण होत असल्याने गणपती नगर, प्रल्हाद नगर, ओंकार पार्क,मयुर कॉलनी, पिंप्राळा ,परिसरातून भाविक मंदिरात येत असतात. या मंदिराचे कळस 25 फुट उंच असून या कळसाचे काम शिल्पकार सचिन सोनावळे यांनी 10 दिवसातच पूर्ण करून दि.30 मे रोजी अखेरचा हात फिरवत मंदिरावर   कळस व  ध्वज चढवत काम पूर्ण केले. याबद्दल शिल्पकार सचिन सोनावळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. मंदिराचे जीर्णोद्धारचे काम सुरु असून दानशूर व्यक्तीने सहकार्य करावे असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.

Protected Content