कोरोना लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी जागांची महापौर , उपमहापौरांकडून पाहणी (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी  । शहरातील कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी वाढत आहे. हीबाब लक्षात घेता उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहराच्या विस्तारित भागात देखील लसीकरण केंद्र उभारण्याबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रस्ताव मांडला होता. यानुसार आज शहरातील काही भागांची महापौर व उपमहापौर व मनपा आयुक्त यांनी भेट देऊन पाहणी केली.

शहरात लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे.  शहरातील कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या परिसरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यानुसार आज महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी विविध भागात भेट देऊन लसीकरण केंद्र उभारणीसंदर्भात माहिती घेतली. यात त्यांनी  पिंप्राळा येथील श्रीमती सीताबाई सोमाणी जळगाव शहर महानगर पालिका शाळा क्र. ४८ भेट दिली. पिंप्राळा येथे लसीकरण केंद्र सुरु केल्यास परिसरातील हुडको, दादावाडी, खोटे नगर आदी परिसरातील नागरिकांना लस घेणे सोयीचे होणार असून या नागरिकांना इतर केंद्रांवर जावे लागणार नाही. याबाबत लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या. यावेळी आयुक्तांनी  शहरातील इतर भागात देखील लसीकरण केंद्र सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1098340337341255

 

Protected Content