आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याची 31 जानेवारीपर्यंत मुदत

jalgaon collector office

जळगाव प्रतिनिधी । उद्योग, व्यापारी, व्यावसायीक, कारखाने इत्यादि आस्थापनांकडे कार्यरत मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती दरवर्षी दर तिमाहीस सादर करावी लागते. त्यानुसार माहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीची माहिती दि. 31 जानेवारी, 2020 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता या विभागाच्या www.mahaswayam.gov.in वेबसाईटवर सादर करावयाची आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी, ज्यांच्याकडे 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या अनुषंगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, 2019 या कालावधीची मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 हे 31 जानेवारी, 2020 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने विभागाच्या वेबसाईटवर भरावे. 31 जानेवारीच्या आत ई-आर-1 विवरणपत्र न भरल्यास पुढील महिन्याच्या एक तारखेपासून विवरणपत्र ऑनलाईन भरता येणार नाही. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील ऑप्शनमधील यावर क्लीक करून लॉगइन मध्ये आपला युझर आयडी आणि पासवर्ड वापरून त्यातील ई-आर-1 या ऑप्श्नमध्ये कार्यरत मनुष्यबळाची माहिती भरावी.

अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगाव या कार्यालयाच्या 0257/2239605 या दुरध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती अ.ला.तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content