Home Cities जळगाव जळगावात सनद मिळण्याचे फाॅर्म उपलब्ध – अॅॅड. मुकुंदराव जाधव (व्हिडीओ)

जळगावात सनद मिळण्याचे फाॅर्म उपलब्ध – अॅॅड. मुकुंदराव जाधव (व्हिडीओ)

0
50

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवोदित वकिलांना सनद घेण्यासाठी आधी मोठ्या शहरांमध्ये अर्ज घेण्यासाठी जावे लागत असे. आता मात्र ‘बार काऊन्सील आपल्या गावी’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगावात अॅड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांच्या माध्यमातून ही सेवा कार्यरत झाली आहे.

 

पूर्वी नवोदित वकिलांना  फाॅर्म घेण्यासाठी  मुंबई किंवा औरंगाबाद येथे हेलफाटे घालावे लागत होते. ही सेवा जळगावात उपलब्ध झाल्याने भावी वकीलांना यापुढे सदरचा त्रास होणार नाही. बार कौन्सिल महाराष्ट्र ॲड गोवाचे जळगावचे पालक सदस्य ॲड. अमोल शिवाजीराव सावंत, औरंगाबाद यांनी नवोदित वकीलांसाठी जे एल. एल. बी. पास झालेल्यांसाठी सनद मिळण्याचे फाॅर्म  जळगावात ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव  यांच्या शाहु काॅम्पलेक्समध्ये ९, ॲडव्होकेट चेम्बर्स या पत्त्यावर उपलब्ध करुन दिलेले आहेत. अधिक माहितीसाठी 8806544472 या भ्रमणध्वनी नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे फाॅर्म वाटपाचे काम ॲड. मुकुंदराव जाधव निस्वार्थपणे भावी वकीलांचे सेवेसाठी करीत आहेत. बार कौंसिल महाराष्ट्र ॲड गोवाचे मेंबर ॲड. अमोल सावंत व जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष केतन जयदेव ढाके यांच्या माध्यमातून बार कौन्सिलच्या अनेक योजना वकीलांसाठी राबविण्याचा मानस ॲड. जाधव यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज शी बोलतांना व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound