चोपडा कनिष्ठ महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळात संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी साहित्य व व्याकरणावर आधारित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 

कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी भाषा अभ्यास मंडळातर्फे इंग्रजी साहित्य व व्याकरणावर आधारित पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एच. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतात ॲड. संदीप पाटील म्हणाले की प्रत्येकाने,आयुष्यात जास्तीत जास्त इंग्लिश पुस्तके वाचण्याची आवश्यकता आहे, जेणकरून या वाचनाद्वारे इंग्लिश विषयाबाबत आपल्या मनात आवड निर्माण होईल. यावेळी त्यांनी विविध इंग्लिश कादंबऱ्यांची व कथांची नावे सांगून सदर इंग्लिश साहित्य ग्रंथालयात जाऊन वाचण्याचे व त्यातील ज्ञान आत्मसात करण्याचे तसेच इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवशी यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची गोडी लागण्यासाठी व स्पर्धेच्या युगात चांगल्या करिअरची संधी मिळण्यासाठी अशा स्पर्धा अत्यावश्यक असल्याचे सांगितले . एकुण १२५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय , तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देण्यात आली. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. बी. एस. हळपे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. दिलीप पंडित सपकाळे व राजेंद्र माध्यमिक विद्यालय, गोरगावले येथील शिक्षक भटु भाईदास कोळी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन १२ वी कला शाखेच्या विद्यार्थीनी मानसी निकम व निकिता पारधी यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा विवेकानंद शिंदे यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. एस. पी. पाटील, समन्वयक प्रा. ए. एन. बोरसे , प्रा. एस. टी. शिंदे, प्रा. ए.पी. लांडगे, प्रा. दिनानाथ पाटील, प्रा. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. दिपाली पाटील,प्रा.विशाल पाटील, प्रा. अभिजित पाटील, प्रा.दिपक करणकाळ, प्रा. निवृत्ती पाटील, प्रा. जयेश पाटील, प्रा. सौरभ जैन, प्रा. संदीप देवरे, निलेश सोनवणे, राकेश काविरे व धीरज बावीस्कर यांनी कामकाज पहिले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

Protected Content