नायगावाची १०० टक्के कोवी-शिल्ड लसीकरणाकडे वाटचाल

यावल  प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव प्राथमिक केन्द्राअंतर्गत येणाऱ्या नायगावच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम ही अंतीम टप्प्यात आली आहे.  आतापर्यंत ८० % टक्के लसीकरणाचे कार्य झाले आहे.

 

नायगाव तालुका यावल येथे जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील व जिल्हा परिषद सदस्यां अरुणाताई पाटील यांच्या मार्गदर्शनानें तसेच नायगाव माजी सरपंच नरेंद्र रंगराव पाटील यांच्या प्रयत्नानी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १४३० डोस पूर्ण झाले आहेत. उर्वरित डोस पुढील काही दिवसात मागवले जातील असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी सांगितले.  त्या स्वतःनायगावच्या लसीकरण केन्द्रावर दिवसभर प्रामुख्याने उपस्थित होत्या.  विशेष म्हणजे लस घेण्यासाठी जमलेल्या नागरीकांमध्ये आदिवासी, तडवी, भील समाजाची संख्या विशेष उल्लेखनिय व लक्ष वेधणारी होती. त्यात जास्त प्रमाणात महिला वर्गाचा समावेश बघावयास मिळाला.  याप्रसंगी डॉ. मनीषा महाजन, डॉ.अशपाक, डॉ.मोहसीन, डॉ. जोशी, डॉ. वकार, सुपरवाईझर डॉ. उषा पाटील, आरोग्यसेविका भावना वारके,आरोग्यसेविका इंगळे, आरोग्यसेविका सपकाळे , आरोग्यसेवक विठ्ठल भिसे, भूषण महाजन, मदतनीस प्रमिला मेढे, आशावर्कर -पुष्पा कोळी,नसीमा तडवी,अर्चना कोळी,महेमूदा तडवी,कल्पना पाटील, पोलीस पाटील-मनोज देशमुख, समाजसेवक-सचिन तडवी, रोहित पवार,हर्षल कोळी,सर्फराज तडवी, नदीम तडवी मुस्तुफा तडवी,विनोद तडवी,नीजोद्दीन तडवी, मोहसीन तडवी, समाधान सावळे, शिवाजी कोळी, चेतन पाटील, महेश पाटील, कुर्बान तडवी, असलम तडवी, जाबीर तडवी, इरफान तडवी, शरीफ तडवी, सरपंच, उप सरपंच व सर्वं सदस्य आणि कर्मचारी ग्रामपंचायत नायगाव व सर्वं स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इन्शानियत गृपचे व सर्वं नायगाव गावातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Protected Content