भुसावळात पुन्हा एक कोरोना पॉझिटीव्ह; दोन बाधित रूग्णांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला असून तो भुसावळचा असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांचे ताजे स्टेटस जाहीर केले आहे. यानुसार- जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, अडावद, चोपडा येथील स्वॅब घेतलेल्या 24 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एक व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती भजेगल्ली, भुसावळ येथील 34 वर्षीय पुरूष आहे. आज भुसावळ येथील दोन कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून यात 50 वर्षीय महिला व 63 वर्षीय पुरूषाच्या समावेश आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 210 इतकी झाली असून त्यापैकी एकोणतीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर जिल्ह्यात आतापर्यंत सत्तावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Protected Content