कोरोना: बाहेगावाहून आलेल्या पाहुण्यांची ग्रामीण भागात धास्ती !

संग्रामपुर प्रतिनिधी । “कोरोना” संकटामुळे अनेक महानगरे ठप्प झाली आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात गेलेल्या कुटुंबियांनी आपले बिऱ्‍हाड गुंडाळून आपापल्या गावाचा रास्ता धरला आहे. पुणे मुंबई सारख्या महानगरात कोरोनाचे अनेक रुग्ण सापडल्याने या गावी येणाऱ्या लोकांमध्येही असू शकतो असे एक ना अनेक प्रश्नांची धास्ती सध्या ग्रामीण भागातील लोकांनी घेतली असून ग्रामीण भागात वातावरण चिंतातुर आहे.

ग्रामीण भागातुन पुणे, मुंबई सारख्या महानगरात रोजगारासाठी अनेक कुटुंब जातात, हे कुटुंब कामधंदा करून आपली उपजीविका भागवून गावी असलेल्या आपल्या नातेवाईकाना सुद्धा आर्थिक मदत करतात. पण आता आलेल्या या येणाऱ्या लोकांची कुठेही वैद्यकीय चाचणी होत नाही. अनेक लोक रेल्वे, खाजगी ट्रॅव्हल्स, तर अनेक जन टेम्पो भाड़याने करून आपापल्या गावी परतत आहेत. हे सर्व जन कुठल्याही वैद्यकीय तपासणी शिवाय गावात येत असून अनेक जन धास्तिने तर काही जन वातावरणातील बदलामुळे आजारी पड़त आहेत, असे लोक खेड़यातील एखाद्या खाजगी डॉक्टरकडे जाउन उपचार करुण घेत आहेत. अशावेळी प्रश्न हा उपस्थित होत आहे कि, असा रुग्ण हा करोना बाधित असला तर तो सामजिक आरोग्य धोक्यात आनू शकतो..? प्रशासनाने अशा येणाऱ्या सर्व लोकांची तपासणी अत्यंत व तात्काळ आवश्यक आहे.

Protected Content