गंगेच्या पाण्याला अचानक हिरवा रंग !

 

वाराणसी : वृत्तसंस्था । वाराणसीत अचानक गंगा नदीचं पाणी हिरव्या रंगाचं दिसून लागलंय. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय.

 

गंगेच्या पाण्याला हिरवा रंग का प्राप्त झालाय? हे शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची एक टीमही गठीत करण्यात आलीय. येत्या तीन दिवसांत अधिकारी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे.

 

खिडकिया घाटापासून मिर्झापूपपर्यंत गंगेचं पाणी ठिकठिकाणी हिरव्या रंगाचं आढळून आलंय. मंगळवारी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून ही तपासणी करण्यात येतेय.

 

२१ मे रोजी पहिल्यांदा गंगेचं पाणी हिरव्या रंगाचं होत असल्याचं समोर आलं होतं. २५ दिवसांपासून गंगेचं पाणी हिरव्या रंगाचं झालंय. ठिकठिकाणी शेवाळही आढळले आहेत. मीडियातून ही गोष्ट समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर नोंद घेतलीय.

 

काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गकाळात गंगेच्या वाहत्या पाण्यात अनेक मृतदेह सोडून देण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर अनेक स्तरांतून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर गंगेचं पाणी वाराणसीपासून बक्सरपर्यंत हिरव्या रंगाचं झालेलं आढळून आलं होतं. १० जून पर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यासंबंधी आपला विस्तृत अहवाल सोपवण्याची शक्यता आहे.

 

Protected Content