रशियात नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली नसल्याचा दावा

 

मॉस्को, वृत्तसेवा । कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यात जगातील शास्रज्ञ प्रयन्त करत असतांना जवळपास महिनाभरापूर्वी, रशियाने जगातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक लशीला मंजुरी दिली होती. मात्र, सुरू असलेल्या लस चाचणीशिवाय रशियन नागरिकांना लस मिळाली नसल्याचा दावा आरोग्य अधिकारी आणि तज्ञांनी केला आहे.

सामान्य नागरिकांना लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा रशियाने केली होती. मात्र, वस्तुस्थिती वेगळी असल्याचे म्हटले जात आहे. रशियातील एका २० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात फक्त २० जणांसाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे. किती नागरिकांना लस देण्यात आली आहे, याबाबत अजूनही रशियन आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली नाही. आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी सांगितले रशियातील अनेक प्रातांत छोट्या प्रमाणावर लस वितरीत करण्यात आली आहे. मात्र, किती लशी वितरीत झाल्या आहेत, याची माहिती त्यांनी दिली नाही. सेंट पीटर्सबर्गजवळील लेनिनग्राड भागात पहिल्यांदा लस पाठवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. लशीचे सध्या मर्यादित स्वरुपात उत्पादन सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होत नसावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रशियन सरकार सामान्यजणांसाठी फार्मसी दुकानात लस उपलब्ध करून देणार आहे. मात्र, सध्या लशीचे मर्यादित उत्पादन पाहता हे कितपत शक्य होईल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Protected Content