खबरदारी म्हणून १५ ऑगस्ट आधी ३५० पोलीस कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खबरदारीचा उपाय म्हणून १५ ऑगस्ट आधीच ३५० पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे कर्मचारी बाहेरील व्यक्तींशी संपर्कात येऊन कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. यात पोलीस हवालदारापासून पोलीस उपायुक्तांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

 

 

दिल्लीतील नविन पोलीस कॉलनीत पोलीस कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना आपल्या कुटुंबांपासून देखील दूर ठेवण्यात आले आहे. तसेच कुणाशीही संपर्क न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व कर्मचारी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यापासून त्यांच्या इतर व्यवस्था पाहणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले. संबंधित ३५० पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कॉन्स्टेबलपासून डेप्युटी पोलीस कमिश्नर रॅंकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांची दररोज कसून शारीरिक तपासणी केली जात आहे.

Protected Content