यावल येथील महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह निमित्ताने कार्यक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे प्राणीशास्त्र विभागामार्फत विद्यार्थी व समाजामध्ये एड्स बाबतीत जनजागृती निर्माण व्हावी म्हणून प्रभारी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स जन जागृती सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला

दरवर्षी १डिसेंबर हा जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधुन सदर सप्ताहाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना एड्स बाबतीत माहिती देतांना एड्स ची लागण व प्रसार कसा होतो याची सविस्तर माहिती त्यांनी उपास्थित विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितली.

तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचे दाखले देत विद्यार्थ्यांना नीती मूल्यांना धरून आचरण करण्याचा सल्ला ही दिला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना एड्स बाबतची शपथ दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांंच्या वतीने  मानवी साखळी निर्माण करून एड्स बदलची जनजागृती करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयातील उप प्राचार्य ए.पी.पाटील, ए.एस. सोनवणे, ई.आर.सावकार, राजेंद्र थिगळे, उदय येवले, रमेश साठे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू तडवी यांनी केले.तर संपुर्ण कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी अमृत पाटील, प्रमोद कदम यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content