सावद्यात कोरोनाचा संसर्ग थांबेना : नवीन सात बाधीत

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना करून देखील कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे दिसून आले असून यात रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सात नवीन बाधीत आढळून आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, सावदा येथे तुलनेत उशीरा कोरोनाचे रूग्ण आढळून आले. तथापि, येथे अलीकडच्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येत आहेत. यात काल रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सात नवीन कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. यात जगमाता चौकातल्या एकाच घरातील तीन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. यातील महिलांचे वय अनुक्रमे ३९, ४० व ३४ तर पुरूषांचे वय अनुक्रमे ३८ आणि २० आहे. यासोबत सोमवारगिरी मढी चौकातील ५१ वर्षे वयाचा तर गांधी चौकातील २२ वर्षांचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

यामुळे सावदा शहरातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या एकूण ५८ झाली अहे. यात नऊ मयत झाले असून सोळा नागरिक उपचार घेत आहेत. तर ३३ रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतलेले आहेत.

Protected Content