डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे शस्त्रक्रिया अभियान हे गरजू रूग्णांसाठी एक पर्वणीच ठरत आहे. या अभियानाला रूग्णांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत ३३६ रूग्णांची नाव नोंदणी झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयातर्फे दि. १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत बिन टाका, चिरा आणि स्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या दुसर्‍याच दिवशी जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा याठिकाणच्या रूग्णांनी नावनोंदणी करण्यासाठी गर्दी केली होती. अभियानासाठी ३३६ गरजू रूग्णांची नावनोंदणी करण्यात आली आहे.

अभियानाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात ६७ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात लेझरद्वारे मुळव्याध, भगंदर, व्हेरीकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे अपेंडीसायटीस, गर्भपिशवीचे आजार, पित्ताशयातील खडे, ओवेरियन सिस्ट, कर्करोग शस्त्रक्रिया, मुत्ररोग शस्त्रक्रिया, मेंदू व मणका शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, एन्जीओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, बलुन शस्त्रक्रिया, व्हॉल्व्ह बदलविण्याच्या शस्त्रक्रिया गरजू रूग्णांवर करण्यात आल्या आहेत.

पुढील चार दिवस नावनोंदणी सुरू राहणार असून ज्या रूग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशा रूग्णांना रूग्णालयात भरती करून घेतले जात आहे. शस्त्रक्रिया अभियानासाठी तज्ञ डॉक्टांची टीम आणि प्रशिक्षीत परिचारीका कार्यरत आहेत. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर रूग्णांची सुटी होईपर्यंत देखभाल करण्यासाठी नर्सिंग स्टाफही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या संदर्भात शल्यचिकित्सक डॉ. वैभव फरके म्हणालेत की, अभियानात दिलेल्या शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च लागतो. मात्र गरजू रूग्णांना हा खर्च पेलविणारा नसल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे हे अभियान राबविले जात आहे. रूग्णांचा या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद ही समाधानाची बाब आहे. जळगावसह विदर्भातील अधिकाधिक रूग्णांनी वेळ न दवडता या अभियानाचा लाभ घ्यावा.

Protected Content