उभ्या बल्करवर धडकली कार : तीन गंभीर जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार चालकाने हायवेवर उभ्या असलेल्या बल्कर वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, भुसावळ येथे कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न बलकर व कारच्या धडकेत तीन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर पूजा कॉंम्प्लेक्स जवळ घडला. सूत्रांच्या माहितीनुसार हायवेवर अचानक कुत्रा आल्यामुळे याला चुकवण्यासाठी चालकाने प्रयत्न केला. मात्र यातच त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार हायवेवर उभी असणार्‍या राखेच्या बल्करवर जाऊन आदळली.

या भीषण अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला असून चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले.

दिपनगर औष्णिक विज केंद्रातून  बाहेर पडणारे राखेचे बल्कर हे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत हायवेवर कसेही उभे असतात. यामुळे अनेकदा अपघात होत असून देखील काहीही कार्यवाही करण्यात आलेले नाही. परिवहन विभागाने अवैधरीत्या उभे असलेले राखच्या  बलकर वर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे अनेक वेळा राखेचे बलकर रस्त्याच्या बाजूला अवैधपणे उभ्या असताना अपघाताच्या घटना परिसरात घडत आहेत.  या परिसरातील चौथी पाचवी घटना असून यात काही जण जखमी जर काही जण मृत्युमुखी पडले आहे.  तरी नागरिकांतर्फे मागणी होत आहे की याबाबत परिवहन विभागाने त्वरित कारवाई करावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Protected Content