एरंडोल येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा

एरंडोल प्रतिनिधी । येथे आज दि.१७ मे रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने एरंडोल शहरात नियम बाह्य दुकाने सुरु ठेवणाऱ्या दुकानदारांनावर व सकाळी 11 वाजेनंतर बाहेर फिरणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रसंगी एरंडोलचे  प्रांताधिकारी श्री विनय गोसावी हे स्वतः रस्त्यावर उतरुन कारवाई करीत होते.त्यांच्या सोबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, एरंडोल न.पा. चे मुख्याधिकारी जनार्दन पवार,कार्यालयीन अधिक्षक हितेश जोगी,पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,तुषार देवरे,पोलीस कर्मचारी संदिप सातपुते,संतोष चौधरी,विकास खैरनार,रवी सफकाळे, बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, विनोदकुमार पाटील, अजित भट,अशोक मोरे, आर.टी.महाजन,प्रकाश सूर्यवंशी, सर्व वसुली कर्मचारी व गृहरक्षक दलाचे महिला व जवान उपस्थित होते.

Protected Content