यावल तालुक्यात ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी- तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी आज मतदान शांततेत संपन्न झाले. यात आता कोण बाजी मारणार हे उद्या समजणार आहे.

यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यात प्रामुख्याने दुपारी अडीच वाजेनंतर गावातील मोठया प्रमाणावर शेती व्यवसाय व शेतमजुरीवर अवलंबुन असलेले शेतमजूर वर्ग घरी परतल्यावर दुपारी तीन नंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली. यात न्हावी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथेही मतदान शांतते पार पडले.

दरम्यान, न्हावी येथे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मतदान केंद्राला भेट देऊन बंदोबस्ताची माहिती घेतली व मतदान सुरळीत चालू द्या असे आदेश दिले. या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धार्थ आखेगावकर व जळगाव येथील दंगा नियंत्रण पथकातील नऊ महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते .

न्हावी ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकी साठी एकूण बारा बुथ होते .त्यापैकी मतदान आठ केंद्रावरती मतदान साडेपाच वाजेला संपले. तर चार बूथ वर मतदारांच्या रांगा असल्याने सायंकाळच्या साडेसहा वाजे नंतर देखील मतदारांनी आपल्या मतदानाचा हवक बजावला. ग्रामपंचायतच्या एकुण ९६८७ मतदाना पैक्की ७६७२ मतदारांनी मतदान केले.

रात्री ८वाजे पर्यंत एकुण ७९ , २०, % टक्के मतदान झाले. न्हावी ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एच .तडवी, अजय महाजन व ईतर महसुलच्या कर्मचारी यांनी संपुर्ण मतदान प्रक्रीया शांततेत व सुरळीत पार पडली .

Protected Content