अर्जेंटीनाने जिंकला फुटबॉलचा विश्‍वचषक

कतार-वृत्तसंस्था | लिओनेल मेस्सीच्या शानदार खेळीच्या मदतीने अर्जेंटीनाने फुटबॉलच्या विश्‍वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

आज विश्‍वचषकाचा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटीना यांच्यात रंगला. यात मेस्सीने पेनेल्टीवर गोल केल्याने त्यांना आघाडी मिळाली. यानंतर दुसरा गोल झाल्याने त्यांचा संघ २-० असा आघाडीवर होता. मात्र खेळाच्या उत्तरार्धात एमबाप्पेने पहिल्यांदा पेनेल्टीवर तर नंतर शानदार गोल करून बरोबरी करून दिली. यामुळे हा सामना अतिरिक्त वेळेत खेळविण्यात आला. यातील पहिला हाफ हा देखील कोणत्याही गोलविना संपला.

दरम्यान, अतिरिक्त वेळेच्या दुसर्‍या हाफमध्ये अर्जेंटीनाच्या संघाने अतिशय आक्रमक खेळ केला. फ्रान्सने त्यांचे आक्रमक परतावून लावले. मात्र मेस्सीने त्यांनी तटबंदी भेदून गोल करत आपल्या संघाला ३-२ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फ्रान्सला तोडता आली नाही. मात्र अतिरिक्त वेळेला तीन मिनिटे कमी असतांना फ्रान्सला पेनेल्टी मिळाली. एमबाप्पेने यावर सहजपणे गोल करत हॅटट्रीकची नोंद केली. यामुळे हा सामना पेनेल्टी शुटआऊटवर पोहचला.

एमबाप्पे याने पहिली पेनल्टी घेत गोल केला. यामुळे फायनलमध्ये चार गोल करण्याचा अनोखा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. या पाठोपाठ मेस्सीने गोल करत हॅटट्रीक नोंदविली. तर फ्रान्सच्या मार्टीनेझची किक मात्र हुकली. यानंतर पुन्हा एक किक हुकली आणि यामुळे अर्जेंटीनाने विश्‍वचषकावर आपले नाव कोरले.

अर्जेंटीनाच्या संघाने या आधी १९७८ आणि १९८६ साली विश्‍वचषक जिंकले होते. यानंतर तब्बल ३८ वर्षांनी मेस्सीच्या जादुई खेळीच्या जोरावर या देशाने तिसरा विश्‍वकप जिंकला.

Protected Content