कोरपावली ग्राम पंचायतीत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोरपावली ग्राम पंचायत मध्ये अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल यांनी सावित्रीबाई फुले यांचे जिवनातील संघर्ष व त्यांनी महिला शिक्षणासाठी केलेले योगदान व त्याचे महत्व समजून सांगितले. मात्र अलीकडेच्या काळात महीला स्वातंत्र संदर्भात समाजाचा स्वैराचार बदलताना दिसत आहे,हा त्या माऊली चा अपमान नव्हे काय असा प्रश्न उपस्थित केला.

अडकमोल पुढे म्हणाले की, स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली,ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी! प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. अशा सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र आहे.

याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल, आरिफ तडवी,मुराद पटेल,भरत चौधरी, पत्रकार फिरोज तडवी अनिल इंधाटे, लिपीक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी यांच्यासह ग्रामस्य उपस्थित होते.

Protected Content