लाडवंजारी समाजातर्फे प्रवीण मुंडेंचा सत्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस दलाचे मावळते पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची दोन वर्षाच्या यशस्वी कारकीर्ती नंतर जिल्ह्यातून बदली झाली. त्यांना निरोप म्हणून जळगाव जिल्ह्यातील समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरूण या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पन्नालाल वंजारी व समस्त वंजारी समाजातील पदाधिकाऱ्यांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.

 

मावळते पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या सत्कारप्रसंगी नगरसेवक प्रशांत नाईक, अशोक लाडवंजारी,  नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील माजी नगरसेवक अनिल देशमुख प्रमोद नाईक आदींसह लाडवंजारी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सर्वप्रथम प्रवीण मुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे व भगवान बाबा यांच्या  प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण लाडवंजारी यांनी केले तर सूत्रसंचालन जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक, कवी विनोद अहिरे यांनी केले.

प्रवीण मुंडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, पोलीस हा कोणत्या जाती धर्माचा राहत नाही, एक वेळा त्याने खाकी वर्दी अंगावर परिधान केली तर तो कोणत्या जाती धर्माचा राहत नाही. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आपलं कर्तव्यच महत्त्वाचा असतं. आपण शिकून मोठे झालं तर आपल्या समाजाला नाहीतर देशातील प्रत्येक समाजाला आपण मार्गदर्शन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. हे विचार सत्य प्रवीण मुंडे यांनी मांडले.

कार्यक्रम कार्यक्रम यशस्वीतेसाठी  आबा ढाकणे, सचिन ईखे, प्रमोद चाटे, हर्षल ढाकणे, योगेश घुगे, कृष्णा पाटील, सतीश सांगळे, संजय पाटील, चांगदेव पाटील, नामदेव वंजारी, अतुल वंजारी, संतोष चाटे, दुर्गेश नाईक, देवेंद्र नाईक, हेमंत नाईक यांनी कामकाज पाहिले.

 

Protected Content