श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानतर्फे “वसु-बारस” निमित्ताने दिव्यांग बांधवांना फराळ वाटप

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान जळगावतर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुध्दा वसु बारस निमित्ताने शहरातील दिव्यांग बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले.

 

शुक्रवार  दि. २१ रोजी हरिविठ्ठल नगर, व्यंकटेश कॉलनी इच्छेश्वर महादेव मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,  सार्वजनिक गणेश उत्सव, महामंडळ उपाध्यक्ष किशोर भोसले,  सार्वजनिक गणेश उत्सव, महामंडळ सदस्य अमित भाटीया , रेड प्लस ब्लड बँक संचालक  डॉ.  भरत (सर) गायकवाड,   विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री देवेंद्र भावसार आदी उपस्थिती होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांचे हस्ते गो-मातेची आरती व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यानंतर उपस्थित दिव्यांग बांधवांना फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार रावसाहेब देवरे, विजय राजपूत, दिनेश खारकर, जितेंद्र दाभाडे, यांनी गोमातेची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे धन्वंतरी देवरे हिने केले तर आभार श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक दिपक दाभाडे यांनी करुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी  दिपक ठाकूर, किसन मेथे, राहुल परकारे, राजु तडवी, श्री देवरे,  साई पाटील, रुपेश मिस्तरी, यांनी कामकाज पाहिले.

Protected Content