पाचोरा मराठा महासंघ अध्यक्षपदी शिवाजी शिंदे

पाचोरा प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा शाखेच्या अध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. बी.भोसले यांनी जाहीर केली आहे. येथील अखिल भारतीय मराठा महासंघाची विशेष बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह, पाचोरा येथे संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष बैठकीत पाचोरा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीला नूतन कार्यकारिणी समवेत एस. ई. पाटील, प्रवीण पाटील, अक्षय देशमुख, शिवाजी बागुल, गणेश भवर, भाग्येश शिंदे, संजय सूर्यवंशी, सुनिल पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.

पाचोरा तालुका मराठा महासंघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष – शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष- प्रा. दौलतराव थोरात, उपाध्यक्ष- सुनिल देशमुख सरचिटणीस – राहूल बोरसे, चिटणीस- चंद्रकांत पाटील, संघटक- प्रदीप सोमवंशी, सहसंघटक – कैलास पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. सुनील पाटील, प्रिंट मिडिया प्रतिनिधी – नगराज पाटील, सोशल मिडिया प्रतिनिधी – गणेश शिंदे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मराठा समाज संघटना व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content