रूग्णालयांमधून मिळणार कोरोनाची लस

मुंबई प्रतिनिधी | देशभरातील रूग्णालये आणि क्लिनीक्समधून आता कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या कोरोनाच्या लसी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने आज याला परवानगी दिली आहे.

 

आता कोरोनाच्या दोन्ही लसी खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे. म्हणजेच आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणे कोरोना लस मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही लसींची प्रत्येकी किंमत २७५ रुपये असणार आहे. तसेच यावर सर्व्हिस चार्ज १५० रुपये इतका लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोवॅक्सीनची सध्या खुल्या बाजारात १२०० रूपये किंमत आहे. तर कोविशील्डचा एक डोस ७८० रुपये आहे. दोन्ही लसींवर १५० रुपये सर्व्हिस चार्ज आहे. सध्या देशात दोन्ही डोस आप्तकालीन वापरासाठी उपलब्ध आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्याने आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांच्या या लसी रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणार आहे.

Protected Content