भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – हिंदुत्वाच्या नावावर देशासह राज्यात राजकीय भोंगे वाजत आहेत.  या भोंग्यांसंदर्भात केंद्राने राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. हिंमत असेल तर सर्वात आधी बिहार, दिल्ली, गुजरातमध्ये लागू करा. आणि सक्तीने त्यांची अंमलबजावणी करा, असे आव्हान खा.संजय राऊत यांनी दिले आहे.

राज्यात राजकीय भोंग्याचा वादामुळे हिंदुत्वाविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत असून हिंदुत्वालाच बदनाम करणे सुरु आहे. बाळासाहेबांनी सर्वात अगोदर मशिदींवरील भोंग्याची भूमिका घेतली होती. त्यांनी युतीचं सरकार आल्यावर  प्रमुख मौलवींना, मुस्लीम नेत्यांना बोलावून  रस्त्यावरील नमाज बंद करीत अनेक प्रश्न चर्चेने सोडवले होते.  त्यामुळे आम्हाला कोणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही, असा टोला खा. संजय राऊत यांनी लगावला आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश मधील लाऊडस्पीकर काढण्यात आलेले नाहीत. गोवंश हत्यासंबंधी धोरण तयार केले. पण त्यात काही राज्यांना सूट दिली. गोव्यासारख्या काही राज्यांनी तर हे धोरण स्वीकारलेच नाही.  मशिदी, मंदिरं, सभा किंवा राजकीय भोंगे कायदा करा. महाराष्ट्र कायदा पालन करणारे राज्य आहे.  हिंमत असेल तर सर्व ठिकाणी सक्तीने त्यांची अंमलबजावणी करा, असे खा. राऊत यांनी भाजपाला सुनावले आहे.

Protected Content