बाजार खरेदीसाठी आलेल्या तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकातील जिल्हा काँग्रेस भवनासमोरून तरूणाची दुचाकी चोरीस गेली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, निलेश जीवन भाट (वय-३०) रा. कंजरवाडा, सिंधी कॉलनी, जळगाव हा चालक असून खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात दुचाकी (एमएच १९ बीझेड ३७१५) आले. त्यांनी त्यांची दुचाकी काँग्रेस भवन समोर पार्क करून बाजारात खरेदीसाठी निघून गेला. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. निलेश भाट याने दुचाकीचा शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवार १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. राजकुमार चव्हाण करीत आहे

Protected Content