Home Cities अमळनेर अमळनेर-गलवाडे रोडवर भीषण अपघात; उभ्या डंपरला दुचाकीची धडक, दोघे जागीच ठार

अमळनेर-गलवाडे रोडवर भीषण अपघात; उभ्या डंपरला दुचाकीची धडक, दोघे जागीच ठार

0
13


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अमळनेर-गलवाडे रोडवर उभ्या असलेल्या डंपरला मागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर ते गलवाडे मार्गावर डंपर रस्त्यावर उभा असताना मागून भरधाव आलेल्या दुचाकीची डंपरच्या मागील बाजूस जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ मोठी गर्दी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर अमळनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतांची ओळख व अपघाताचे नेमके कारण याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound