एम्को कंपनीतून ७३ हजाराचे साहित्याची चोरी; आठ जणांविरूध्द गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी फाटा वाघुर धरणाजवळील एम्को प्रायव्हेट लिमीटेड (सिद्दार्थ इंडस्ट्रीज) या कंपनीतील इलेक्ट्रीक मोटर्स व इतर साहित्य असा एकुण ७३ हजाराचा मुद्देमाला चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम्को प्रायव्हेट लिमीटेड (सिद्धार्थ इंडस्ट्रीज) या कंपनीचा ताबा एनसीएलटी न्यायालयाकडून लिक्विडेटर म्हणून सुन्द्रेश भट यांच्याकडे आला आहे. पब्लिक सिक्युरिटी अ‍ॅंण्ड प्लेसमेंट या फर्मला या कंपनीच्या सिक्युरिटीचे कंत्राट देण्यात आले आहे. या सिक्युरिटी फर्ममधे काम करणा-या सिक्युरिटी गार्ड व सुपरवायझर अशा सर्वांनी मिळून त्याच्या कब्जातील मालमत्तेची संगनमताने चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इलेक्ट्रीक मोटारी व अ‍ॅल्युमिनीयम व्हिल असा एकुण 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ५ जानेवारी २०२१ ते ६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान चोरी झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणीअनिलकुमार श्रीमुंशीराम वर्मा (जिल्हा भिवानी हरयाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार चंद्रभान पटेल, अशोक चंद्रभान पटेल (दोघे रा. बरहज जि. देवरीया बेलवा उत्तर प्रदेश), प्रितमकुमार सदानंद मौर्य (रा. चुहिया जि.देवरीया उत्तर प्रदेश), शशीकांत सतीराम (रा. बढाईपुर सिकडोहर, आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश), सुग्रीव कुमार रामप्रसाद ( रा. मैनी पोस्ट खंबा रुधौनी खुर्द उत्तर प्रदेश), तारकेश्वर स्वामीनाथ पटेल (रा. देवरीया उत्तर प्रदेश), रजनीश त्रिभुवन पटेल (रा. चंद्रभागा चाळ, बोनकोडे श्रमिक कोपरखैराणे ठाणे), धरमेंदर दोलीचंद सैनी (रा. ओल मथुरा उत्तर प्रदेश) अशा आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊवाजता  गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स.पो.नि. प्रमोद कठोरे करत आहेत.

 

Protected Content