ओरिऑन इंग्लीश शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे आदिवासी पाड्यावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ओरीऑन शाळेतील विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त जामुनखेडा ता.यावल येथे जाऊन तेथील आदिवासी कुटूंबाना गहू,तांदूळ, साखर,तेल इ.जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

या सर्व जीवनावश्यक वस्तू शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छने संकलित केल्या होत्या.त्या वस्तू पाड्यावरील गरजू कुटुंबाना शाळेचे सर्व कॅप्टन व प्रिफेकट्स यांनी वाटप केले व त्यांच्या सोबत बालदिन साजरा केला.यावेळी पाड्याचे मुखींया प्रमुख व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे व शाळेचे प्राचार्य डॉ. ब्रूस हेंडरसन यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Protected Content