महसूल सप्ताह निमित्त सावद्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|  येथील पालिका संचलित श्री आगंम हायस्कूल व नागो पाटील कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची युवा संवाद कार्यक्रमातून विविध शासकीय दाखल्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

 

महसूल विभागातर्फे सावदा शहरात महसूल सप्ताह निमित्त आज दुसऱ्या दिवशी पालिका संचलित श्री आगं हायस्कूल व नागो पाटील कनिष्ठ महाविद्यालयात मंडल अधिकारी प्रकाश वानखेडे यांच्या उपस्थितीत श्रीहरी कांबळे,ओमप्रकाश मटाले, मोमीन अप्पा व मुख्याध्यापक सी.सी सपकाळे,शिक्षक पालक संघाचे सदस्य श्याम पाटील ,सुरेश बोरनारे,अमीन तडवी यांच्या उपस्थितीत  विद्यार्थी विध्यर्थिनी शी युवा संवाद कार्यक्रम करण्यात आला .

 

या युवा संवाद कार्यक्रमात श्रीहरी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांबाबत शासकीय  दाखल्यांचे कागदपत्राचे नियोजन कसे करावे व कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या दाखल्या साठी  कोणती कागदपत्रे आवश्यक आहे याची माहिती दिली व शासकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या नऊ दाखल्यांना आपल्याला हे कागदपत्रचा पूर्तता केल्यावरती एवढ्या दिवसात आपल्याला दाखला मिळेल हेही सांगितले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने दहावी ते बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते व त्यांचे वर्गशिक्षक भारती भंगाळे, मनोज महाजन, कल्पना शिरसाळ ,ए.बी तेली उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक नंदू पाटील यांनी केले.

Protected Content